You are currently viewing सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा ३ एप्रिल रोजी

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा ३ एप्रिल रोजी

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा ३ एप्रिल रोजी

सावंतवाडी:

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक ०३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता नगरपरिषद पत्रकार कक्ष, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेमध्ये मागील इतिवृत्ताचे वाचन व खर्चास मंजुरी, तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीत सहसचिव प्रतिनिधी निवड करण्याच्या विषयांवर चर्चा होणार आहे. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळचे विषय देखील घेतले जातील.

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, आजी माजी पुरस्कार विजेते आणि सभासदांना या सभेला उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी बैठकीमध्ये सावंतवाडी तालुक्यातील दोन पत्रकारांची सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये निखिल माळकर आणि रुपेश हिराप यांचा समावेश आहे. या दोघांचेही सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने हार्दिक अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा