You are currently viewing रस्ता व वीज समस्यांबाबत कार्यवाही न केल्यास १ एप्रिलला उपोषण

रस्ता व वीज समस्यांबाबत कार्यवाही न केल्यास १ एप्रिलला उपोषण

रस्ता व वीज समस्यांबाबत कार्यवाही न केल्यास १ एप्रिलला उपोषण

शिरशिंगे ग्रामस्थांचा सार्वजनिक बांधकाम व वीज वितरणला इशारा

सावंतवाडी

शिरशिंगे गोठवे शाळा नं.२ ते गोठवेवाडीपर्यंत मंजूर असलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत तसेच शिरशिंगे गावातील तीन वाड्यांचा प्रलंबित विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी ११ केव्ही लाईन मंजूर करण्याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास बुधवारी १ एप्रिल रोजी सावंतवाडीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा शिरशिंगे माजी सरपंच सुरेश शिर्के आणि ग्रामस्थांनी दिला आहे.शिरशिंगे गोठवे शाळा नं.२ ते गोठवेवाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण मंजूर असूनही गेले दोन वर्षे प्रतीक्षेत आहे. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या धोकादायक रस्त्यावर अपघाताची शक्यता आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अनेक वेळा लक्ष वेधूनही संबंधित अधिकारी व ठेकेदार या रस्त्याचे काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी आहे.तसेच शिरशिंगे येथील धरण क्षेत्राच्या वरच्या भागात गोठवेवाडी, परबवाडी, मळईवाडी या वाड्या येतात. या वाड्यात जाणारी (११) इलेव्हन के.वी. लाईन धरण चालू करताना तात्पुरत्या स्वरुपात घनदाट जंगल व दऱ्यांमधून देण्यात आलेली होती. या भागात घनदाट जंगल भागातून वीज वाहिनी गेल्याने विज लाईन वेळोवेळी नादुरुस्त होते. दरवर्षी पावसाळ्यात अशीच स्थिती होते. या तीन वाड्यात साधारणपणे १००० लोकवस्ती असून याचा परिणामी शाळेतील मुले यांच्या अभ्यासावर होतो. त्यामुळे आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करुन ११ केव्ही लाईन धरण क्षत्रातील कायमस्वरुपात काढण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावरुन घेण्यात यावी. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे मात्र याकडे महावितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल तीव्र नाराजी आहे. त्यामुळे या रस्त्यासह ११ केवी वीज वाहिनीबाबत येत्या आठवड्यात कार्यवाही न केल्यास १ एप्रिल रोजी उपोषण छेडण्याचा इशारा शिरशिंगे ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम खाते, सावंतवाडी पोलीस स्थानक तसेच प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालय आणि वीज वितरण कंपनीला देण्यात आलेल्या आहेत.वेब स्टोरी

गुवाहाटी (आसाम) येथे रोंगाली बिहू महोत्सव साजरा करण्यात आला

‘आयपीएल 2025’चा धमाका आजपासून

उन्हाळ्यात आरोग्यासाठी कोरफड फायदेशीर

सुनीता विलियम्स यांचे पृथ्वीवर लँडिंग पाहा फोटो…

बॉलीवूडमधल्या सिलेब्सनी आपल्या कुटुंबासोबत केली रंगांची उधळण…

‘विकी कौशल’ने आपल्या कुटुंबासोबत साजरी केली धुळवड

दोन वर्षांचं नातं संपलं अभिनेत्रीने सांगितले एक तरफी प्रेमाचे कारण…..

बॉडीबिल्डींगमध्ये देशात नाव गाजवलेल्या दिपा सप्रेंच्या पतीने दिली अनमोल साथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनंतर अंबानींच्या ‘वंतारा’चे उद्घाटन

मला नातीने आजी म्हणून नये, ६५ वर्षाच्या अभिनेत्रीची इच्छा !
Advertisement
Read More

प्रतिक्रिया व्यक्त करा