You are currently viewing प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणूकीसाठी कटिबध्द !

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणूकीसाठी कटिबध्द !

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणूकीसाठी कटिबध्द !

कुडाळचे नूतन गटशिक्षणाधिकारी विनायक पाटील यांची ग्वाही

कुडाळ

तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपण कटिबध्द राहू असे आश्वासन कुडाळचे नूतन गटशिक्षणाधिकारी यशवंत पाटील यांनी प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सहविचार सभेत दिले. 31 मार्चपूर्वी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक समितीला भेट मिळावी असे निवेदन देण्यात आले होते.यानुसार कुडाळचे नूतन गटशिक्षणाधिकारी यशवंत पाटील यांनी संघटना शिष्टमंडळासोबत सहविचार सभा घेत विविध प्रलंबित प्रश्न जाणून घेतले. यावेळी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कौरगावकर ,तालुकाध्यक्ष शशांक आटक ,सचिव महेश गावडे ,राज्य पदाधिकारी सचिन मदने ,चंद्रकांत अणावकर,प्रसाद वारंग,संतोष वारंग, महेश कुंभार, आपा सावंत, शैलेंद्र न्हावेलकर, सुरेखा कदम , महिला आघाडी सचिव सुगंधा अणावकर, स्वामी सावंत, धोंडी मसूरकर, अनंत राणे , बाळकृष्ण मर्गज , दत्ता तवटे आदी उपस्थित होते. तर विस्तार अधिकारी संदेश किंजवडेकर,स्वप्नाली वारंग,सुलभा देसाई,कुणाल तेंडोलकर,समीर सावंत, शिल्पा बांदेलकर , बावलेकर आदी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षकांचे खालील विवीध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली.1) दिनांक 11 मार्च 2024 रोजी घेतलेल्या नियोजित बैठकीमध्ये ज्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती त्या त्यापैकी किती विषयावर कार्यवाही झाली यावर चर्चा करण्यात आली ,2)शालार्थ पगार देयके हार्ट कॉपी मुख्याध्यापकांना मिळण्याबाबत सांगण्यात आले त्यानुसार ही हार्डकाॅफी दिली जाईल असे गशिअ यांनी सांगितले प्रशिक्षण तसेच इतर आदेश हे लेखी स्वरूपात मुख्याध्यापकांना किंवा संबंधित शिक्षकांना देण्यात यावेत यापुढे असे कार्यवाही केली जाईल असे गटशिक्षण अधिकारी महोदय यांनी सांगितले, 3)आर्थिक देयके एमडीएम तसेच चार टक्के सादिल, समग्र शिक्षा अभियान व इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक देयके शाळेच्या खात्यावर जमा झाल्यानंतर त्याची हार्ड कॉपी मुख्याध्यापक यांना देण्यात यावी अशी आग्रही भूमिका संघटनेने मांडली व त्यास माननीय गटशिक्षणाधिकारी यांनी अनुमती दिली ,4)शालेय पोषण आहार पुरवठा व येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली कोणत्याही परिस्थितीत शाळेच्या वेळेत धान्य पुरवठा करण्यात यावा पुरेसा धान्य पुरवठा प्रत्येक शाळेत पोहोचवावा धान्याचा दर्जा चांगला असावा या बाबींवर चर्चा करण्यात आली,5)एमडीएम ॲप सध्या बंद असून काहीजणांच्या मोबाईल मध्ये ते ओपन होत नाही त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची दररोजची हजेरी भरण्याचे काही शाळांचे राहिले आहे तरी संबंधित यंत्रणेला मागील उपस्थिती भरण्यासाठी टॅप ओपन करून देण्यात यावा असे सांगण्यात आले ,6)शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेढी निवड श्रेणी प्रस्ताव जिल्ह्याला किती पाठवण्यात आले त्याचप्रमाणे मंजूर होऊन किती आले याचा आढावा घेण्यात आला तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी शिक्षकांच्या फरकाची रक्कम लवकरात लवकर करण्यात यावी असे सांगण्यात आले,8) शिक्षकांची सेवापुस्तके अपडेट करण्यासाठी एप्रिल 2025 मध्ये दुपार सत्रामध्ये कॅम्प लावण्यात यावे व केंद्रीय नियोजन करून शिक्षकांची सेवा पुस्तके अपडेट करण्यात यावीत असे सांगितले, 9)शिक्षकांची प्रलंबित मेडिकल बिले लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन ती जिल्ह्याला सादर करावी मेडिकल बिला मधील त्रुटी एकाच वेळी काढाव्यात पुन्हा पुन्हा त्रुटी काढून बिल मागे जाऊ नये याबाबत जिल्ह्याला आपण कळवावे असे सांगितले ,10) शिक्षकांना करावे लागणाऱ्या ऑनलाईन कामाबाबत व त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली 128 मानके भरत असताना शिक्षकांना अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे सदरील काम कोणत्याही परिस्थितीत लवकर होणार नाही स्कोप ची माहिती भरण्यासंदर्भात प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रशिक्षण देण्यात यावे ,11) केंद्रांतर्गत शिक्षकांना कामगिरी पाठवत असताना परस्पर मुख्याध्यापकांना पत्र देऊन कामगिरी शिक्षक न पाठवता केंद्रप्रमुखांचे पत्र कामगिरीवर जाण्यासाठी पाठवण्यात यावे, 12)शाळा सोडल्याचा दुय्यम दाखला देत असताना नेमका बॉण्ड पेपर घ्यावा का व किती रुपये घेण्यात यावे या संदर्भात शाळांना पत्र पाठवण्यात यावे,13) नवनियुक्त 19 शिक्षक ज्यांच्याकडे मुख्याध्यापक चार्ज आहे त्यांचे प्रशासकीय कामकाज व लेखे कसे लिहावेत या संदर्भात एक दिवसाचं मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात यावा,14)नवीन नेमण्यात आलेल्या शिक्षण सेवकांना पुढील पाच वाढीव महिन्यासंदर्भातले पत्र मुख्याध्यापकांना मिळावे,15) कुडाळ तालुक्यातून मे 2023 रोजी वेंगुर्ले तालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांची सेवा पुस्तके अपडेट करून लवकरात लवकर पाठवण्यात यावी ,16)सर्व गणवेश प्राप्त झा

प्रतिक्रिया व्यक्त करा