You are currently viewing २७ मार्च रोजी पालकमंत्री नितेश राणे यांचा ओरोस येथे “जनता दरबार”

२७ मार्च रोजी पालकमंत्री नितेश राणे यांचा ओरोस येथे “जनता दरबार”

सिंधुदुर्ग :

मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत ते जनतेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जनतेची प्रश्न ऐकून घेणार आहेत. प्रत्येकाला भेटणार आहेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार आहेत. तरी या जनता दरबारात जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा