*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*💋💋तू दिलेल्या चुंबनाने 🫦🫦*
तू दिलेल्या चुंबनाने फक्त साधा घोळ झाला
भोवताली सुंदरींचा दांडगा मोहोळ झाला ।।१।।
पवन गेला स्पर्शुनी अन् गंध गेला घेऊनी
नाव हे दाहीदिशांना आपुला कल्लोळ झाला ।।२।।
आपुल्या या बंधनाची फक्त थोडी ज्योत होती
लोकदृष्टि पाप मोठे अग्निचा तो लोळ झाला ।।३।।
पाहण्या तुजला मला लोक हे आसूसलेले
निंब हा ओठी जयांच्या पाहता कंकोळ झाला ।।४।।
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
नाशिक ९८२३२१९५५०