शिरोडा येथे “मालवणी साहित्य संमेलन” ३१ मार्चला
वेंगुर्ले
साहित्य प्रेरणा कट्टयाच्या सलग ५३ व्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने ३१ मार्चला दुपारी ३.३० ते रात्री ८ या कालावधीत “मालवणी साहित्य संमेलना”चे आयोजन केले आहे.
शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या कै. मच्छिंद्र कांबळी सभागृहात होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मालवणी बोलीभाषेचे अभ्यासक सतीश लळीत हे असतील. या संमेलना मध्ये दुपारी ३.३० ते ४ नोंदणी, दुपारी ४ ते ५ या वेळेत संमेलनाचे उद्घाटन, संध्या. ५ ते ६ या वेळेत मालवणी साहित्यात काय असावे, काय नसावे? या विषयावर परिसंवाद असणार असून यामध्ये भाऊसाहेब गोसावी (अध्यक्ष) व सौ. कल्पना मळये, सौ. तनुजा तांबे सहभागी होणार आहेत. तर संध्या. ६.१५ ते ६.३० कै. जयवंत दळवी यांचा मालवणीनामा हा कार्यक्रम, संध्या. ६.३० ते ७.३० कविसंमेलन यामध्ये अध्यक्षा डॉ. सई लळीत सहभागी होणार आहेत. आणि त्यानंतर संमेलनाचा समारोप असणार आहे. संमेलनाच्या अधिक माहितीसाठी ९४०३०८८८०२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्टा, आजगाव चे समन्वयक विनय सौदागर आणि र.ग. खटखटे ग्रंथालय, शिरोडा चे कार्यवाह सचिन गावडे यांनी केले आहे.