You are currently viewing सागरी पर्यावरणामध्ये बायोजिओ केमिकल चे भवितव्य व संशोधन संधी या विषयावर श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या वतीने लेक्चर सिरीज संपन्न.   

सागरी पर्यावरणामध्ये बायोजिओ केमिकल चे भवितव्य व संशोधन संधी या विषयावर श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या वतीने लेक्चर सिरीज संपन्न.  

सागरी पर्यावरणामध्ये बायोजिओ केमिकल चे भवितव्य व संशोधन संधी या विषयावर श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या वतीने लेक्चर सिरीज संपन्न.

सावंतवाडी

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सेंटर फॉर मरीन इनव्हीराॅनमेंट मालवण व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने
सागरी पर्यावरणाचे बायोजिओ केमिकल मधील भवितव्य व यामधील संशोधन संधी या विषयावर तीन दिवसीय लेक्चर सिरीज चे आयोजन करण्यात आले होते.
या लेक्चर सिरीज चे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमसावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल, रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचे प्रा. दिलीप गोडकर,
रसायनशास्र विभाग प्रमुख डाॅ. डी बी शिंदे,वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ. यु एल देठे,प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सौ प्रतिक्षा सावंत,भूगोल विभाग प्रमुख डॉ. एस एम .बुवा,शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर मरीन इनव्हीराॅनमेन्ट मालवणचे समन्वयक प्रा.डाॅ. नितीन कांबळे ,लेक्चर सिरीज साठी उपस्थित प्रो. गजानन राशिनकर, डॉ.मानसिंगराज निंबाळकर ,
तसेच महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व भूगोल या विषयाचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या लेक्चर सिरीज मध्ये पहिल्या दिवशी रसायनशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील प्रो. गजानन राशिनकर
यांनी सेट व नेट
परीक्षांचा अभ्यास कसा करावा याची अभ्यासपूर्ण माहिती दिली.
वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ.
मानसिंगराज निंबाळकर यांनी वनस्पतीशास्त्र विषयातील संशोधनाच्या संधी या विषयावर माहिती दिली. प्राणीशास्त्र विभागाचे व सेंटर फॉर मरीन इनव्हीराॅनमेन्ट मालवणचे समन्वयक प्रो. नितीन कांबळे यांनी मानवी जणूकशास्त्र व त्यामधील निर्माण झालेल्या डिफॉरमेटीज
या विषयावर माहिती दिली.
लेक्चर सिरीजच्या दुसऱ्याा दिवशी प्रो. सौ. व्हि डी राठोड वनस्पती शास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
यांनी कोकणात सापडणाऱ्या विविध औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग व त्यामधील संशोधनाच्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.
डॉ. आसावरी जाधव पर्यावरण शास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी पर्यावरण व जागतिक तापमान वाढ या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली व प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच जागतिक तापमान वाढीमुळे जगभरामध्ये निर्माण झालेली संकटे या विषयावर भाष्य केले. दिली.डॉ.मीना पोद्दार
भूगोल विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी भूगोल विषयांमधील संशोधनाच्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.
लेक्चर सिरीज च्या तिसऱ्या दिवशी प्रो.डाॅ. सुनील गायकवाड प्राणीशास्त्र विभाग ,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी जैवविविधता या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.एकंदरी त जैवविवीधतेवर होणारा परिणाम व तीचे सवंर्धन ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले.
डॉ. इरान्ना उडचान,
अन्न तंत्रज्ञान विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी अन्नासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रिझर्वेटिव्ह टेक्निक याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या भाषणामध्येे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व सर्व लेक्चर सिरीज मध्ये भाग घेतलेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या सर्व प्राध्यापकांचेआभार मानले व त्यांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विषयाचे विभाग प्रमुख डॉ. एस एम बुवा, प्राणीशास्र विभागाचे डाॅ.जी.एस.मर्गज व रसायनशास्राचे प्रा.दत्तप्रसाद मळीक यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा