*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मी मला सापडले*
आता आताशी
मी मला सापडले
व्यर्थ दवडले
आयुष्य…..
घर संसार
मुलाबाळांवर द्यायचे लक्ष
त्यासाठी दक्ष
संसारात…
मनात डोकावून
बघायला कुठे वेळ
संसाराचा तालमेळ
साधण्यात…
सांभाळले गणगोत
कर्तव्य नीट बजावले
मोकळी झाले
जबाबदारीतून…..
आता निवांत
आठवू लागले आवड
काढते सवड
त्यासाठी
शब्दांची दुनिया
निसर्ग झाडं फुलं
समोर दिसलं
कलादालन….
गीतांचे सूर
पुन्हा आपसूक उमटले
आनंदाने गायले
गाणं…
सापडले मला
माझे खरे मीपण
अस्तित्व जतन
करताना…..!!
🎼🍃🍃💦🍃🍃💦🎼
अरुणा दुद्दलवार @✍️