*सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासोबत बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर चर्चा.*
कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांची भेट घेतली यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासंदर्भात चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त नसून अजूनही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकच सहाय्यक कामगार आयुक्त आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहतात यात कामगारांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी आमदार निलेश राणे यांनी कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांची भेट घेऊन चर्चा केली.