*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मानाने सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गोष्ट शब्दांच्या मानापमानाची…!!!*
मदतीला आलेला शब्द
कोणत्या जातीधर्माचा नसतो
अनामिक वर्दळीतला तो….
माणूसकीचा आवाज असतो..!
मौनातून येणारी शांतता
शब्दचं भंग करतो
मापदंड थिटं पडावं
शब्दचं मानापमान जपतो..!
नादरूपात चिरंतन राहत
विस्कटलेली घडी सावरतो
हरवलेल्या शब्दांचा बंगला
घराशेजारीच बांधून देतो..!
कधीकधी शब्दांची माघार
दुधारी तलवार असते
दागिना मिरवून दाखवत
पेटीत बंदिस्त ठेवते..!
शब्दांची संतापजनक उपेक्षा
मानापमानात मान्यचं नाही
चुकीच्या समेवर आघात
शब्द….हातातलं खेळणं नाही..!
शब्द..हातातलं खेळणं नाही
शब्दांचा.. अनादर चालणार नाही..
बाबा ठाकूर