*ज्येष्ठ लेखक कवी संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सण गुढीपाडवा आला*
चैत्र शुद्ध प्रतिपदेला श्रीराम परतले अयोध्येला
लक्ष्मण, सीतेसह स्वयम रामभक्त हनुमान आला
निर्दालूनी रावणलंकेस विजयाचा वाजविला डंका
पारिपत्य अत्याचाराचे दर्शवी जयपताका ना शंका
भयमुक्त झाले जुलूम संपले अभय मिळाले सर्वां
वानरसेनेसवे कल्पी हरण केले दशानन गर्वा
पाने फुले नि गुढ्या तोरणे उभारूनी सजली नगरी
वसंत ऋतुराज देई नवचैतन्याची ग्वाही अंबरी
नव खरेदी, नव परिधान, नव मिष्टान्न, वा संकल्प
महाराष्ट्रात शालिवाहन शक प्रारंभ पंचांग दीप
सोडा मनातली अढी असावा कायम नात्यांत गोडवा
जपावी माणूसकी संस्कृती ही खरेच सांगतो पाडवा
-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
द्वारा डॉक्टर साई प्रसाद कुमठेकर
अनिका पिकॅडिली
ए-५०३
पुनावळे बाजार, पुनावळे, पुणे-४११०३३