*सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू -मा.पालकमंत्री नामदार श्री.नितेशजी राणे साहेब यांचे प्रतिपादन*
*भाजप आमदार मा.श्री.निरंजन डावखरे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील ३५शाळांना संगणक वाटप*
संपूर्ण कोकणातील शाळा डिजिटल करण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना मनाशी बाळगून शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणाऱ्या मा.खासदार श्री.नारायणराव राणे साहेब आणि मा.ना.रविंद्र चव्हाण साहेब यांच्या सुचनेनुसार भाजप आमदार श्री निरंजन डावखरे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील ३५शाळांना मा.ना.श्री.नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते संगणक व प्रोजेक्टर वाटप करण्यात आले.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मा.खासदार श्री.नारारणराव राणे साहेब यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हा प्रगतीकडे वाटचाल करत असताना शैक्षणिक विकास होणे आवश्यक आहे आणि यासाठी आम्ही सर्वजण भाजपच्या माध्यमिक प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याची जबाबदारी आमची राहिल असे शाश्वत आश्वासन पालकमंत्री तथा मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री ना.नितेशजी राणे साहेब यांनी यावेळी दिले.यावेळी भाजपचा अध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत साहेब यांनी आमदार श्री निरंजन डावखरे आणि आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा संपूर्ण निधी शाळांच्या विकासासाठी वापरला जाईल असे सांगितले.यापुर्वी आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून १३८शाळांना डिजिटल साहित्य देण्यात आले तसेच आता ३५शाळांना डिजिटल साहित्य दिले तर आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार निधीतून १९०शाळांना इ लर्निग साहित्य आणि १६०शाळांना सोलर पॅनल देण्यात आल्याचे श्री.प्रभाकर सावंत यांनी सांगितले आणि मा.आ.श्री निरंजन डावखरे यांचे विशेष आभार मानले.या वेळी गेल्या दोन वर्षांत शाळांना मोठ्या प्रमाणात ई लर्निग साहित्य आणि सोलर पॅनल उपलब्ध करून दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री तथा मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री ना.श्री.नितेशजी राणे साहेब, भाजप सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत साहेब, जिल्हा बॅंक अध्यक्ष श्री.मनीष देसाई,उपाध्यक्ष श्री.प्रसन्ना देसाई, सरचिटणीस श्री.संदिप साटम, सरचिटणीस श्री.महेश सारंग, कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री.मनोज रावराणे, श्री.संतोष कानडे, भाजप पदाधिकारी उपस्थित होते तर कार्यक्रमास संस्था चालक, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्र संचलन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे यांनी केले तर आभार श्री.कर्पे सर यांनी मानले.
्