अधिकारी सकारात्मक मानसिकतेचे असतात तेव्हा जनहिताचे काम उभे राहते
मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे गौरवोद्गार
कणकवली –
हळवल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन शासकीय इमारतीचे झाले उद्घाटन
कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र सरकारमध्ये असल्याने कामाला गती
कणकवली – अधिकारी जेव्हा सकारात्मक मानसिकतेचे असतात, अनुभवी असतात, त्याचा फायदा सामान्य जनतेला होतो. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कारकिर्दीमध्ये पाहिले तर रेस्ट हाऊस, रस्ते यांची परिस्थिती चांगली झाली, कणकवली रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण झाले अशी अनेक काम त्यांनी केलेली आहेत. चांगले कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत आहेत.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन मत्स्य विकास व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे केले. ते कणकवली – हळवल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन शासकीय इमारतीचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन जिल्हाध्यक्ष विजय प्रभु, प्रांताधिकारी जगदीश कातकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उपअभियंता विनायक जोशी, विभागीय अभियंता श्रीमती कमलिनी प्रभू, कनिष्ठ अभियंता श्रीमती संजिवनी थोरात, जि. प. चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी सभापती मनोज रावराणे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, प्रमोद ठाकूर, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, संतोष कानडे, रामू विखाळे, दिगंबर पाटील, संदीप सावंत, निसार शेख, मेघा गांगण, अशोक करंबेळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे सर्व श्रेय हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जात. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला. किरकोळ कामांसाठी आपल्याला रत्नागिरी येथे जावं लागत असे. आपल्या जिल्ह्यत आपल्या हक्काच सार्वजनिक बांधकाम च कार्यालय असलं पाहिजे ही ईच्छा सर्वांची होती. ती पूर्ण करण्याचे काम माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम कार्यालयचे उद्घाटन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना अपेक्षित असा कारभार सार्वजनिक बांधकाम च्या कार्यालयात झालं पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केली. कार्यालय हे भ्रष्टाचार मुक्त असलं पाहिजे. त्यावर माझा आग्रह आहे. आपण करत असलेल्या कारभारात पारदर्शकता असली पाहिजे. लोकाभिमुख काम असलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार काम असले पाहिजे. याकडे या कार्यालयात बसलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने बारकाईने लक्ष दिलेलं असलं पाहिजे.
खा. नारायण राणे यांचा १९९० पासून आजपर्यंत चा जो प्रवास आहे. या जिल्ह्याला विकसित करण्यामागे रस्त्याच्या जाळ सर्वात महत्वाची बाब आहे. आपल्या जिल्ह्यात १९९० च्या अगोदर लाल मातीचे रस्ते असायचे. आपल्या जिल्ह्यात प्रमुख रस्ते झाले, वाडीनिहाय रस्ते झाले आहेत. रस्त्याबाबत एवढी अपेक्षा वाढली आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाच भीती वाटू लागली आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारकडून जे काही अपेक्षित आहे. सरकार कडून काही बिल पेंडिंग राहिलेली आहेत. मात्र येणाऱ्या महिन्याभरात सर्व ठेकेदारांना गोड बातमी मिळेल, असा विश्वास पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिला. खा. नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी साधारणपणे ३८ पुलांना मान्यता दिली आणि बांधून देखील घेतले. त्यामुळे आमच्या जिल्ह्याच्या दळणवळणाला खूप मोठा फायदा झाला. आमचा जिल्हा हा डोंगराळ जिल्हा आहे. काही गाव दुर्गम भागात आहेत. त्यामध्ये रस्त्याचे जाळे बंधन हे आम्हाला विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेल्यावर दर्जेदार रस्ते दिसतील. राज्य सरकारने काँक्रीटच्या रस्त्यांचे काम सुरू केलेले आहे. आमचा जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे रस्त्यांच्या दर्जेदार कामांमुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा पारदर्शक कारभार आहे. त्याचा प्रतिबंध प्रत्येक स्तरावर प्रत्येक सरकारी कार्यालयात दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात क्यू आर कोड च्या माध्यमातून फीडबॅक मागवणे हे धाडसाचे काम आहे. याची जबाबदारी सोपी नसते. लोक लहान लहान विषयावरून कसे भांडत असतात, याचा अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला वर्षानुवर्षाचा आहे. लोकांची सोयीस्कर काम कमी वेळेत कोणताही त्रास नव्हता पूर्ण व्हावी, यासाठी आमच्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या माध्यमातून पुढाकार घेतलेला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. याच अनुकरण राज्यातील अन्य बांधकाम कार्यालयांनी कराव, अशी आग्रही मागणी बांधकामंत्र्यांकडे करणार असल्याचेही पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले.