“एमआयटीएम” इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची “सॉफ्टलॅब्स” ग्रुपच्या मालवण कार्यालयास शैक्षणिक भेट
ओरोस
सुकळवाड ओरोस येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेज मधील ४९ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या मालवण कार्यालयास शैक्षणिक सहलीसाठी भेट दिली. या भेटीत आंतरराष्ट्रीय पातळीवर आयटी क्षेत्रातील उद्योजकीय संधी विषयावर विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.
यावेळी सहाय्यक प्राध्यापक सुदेश जामसंडेकर आणि मृणाली कुडतरकर उपस्थित होत्या. मालवण टीमच्या वरिष्ठ सदस्यांनी सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या सेवांची माहिती देताना, आयटी उद्योगातील अनुकूलता आणि एकंदरित आय टी क्षेत्रातील शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. या भेटीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थी आणि सध्याच्या इंटर्न्समधील संवाद. या इंटर्न्सनी संवाद साधताना त्यांचे अनुभव शेअर केले. ज्यात त्यांनी सॉफ्टलॅब्समध्ये त्यांच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या व्यावसायिक मार्गदर्शनावर प्रकाश टाकला. त्यांनी उपप्राचार्य पूनम कदम, सॉफ्टलॅब्स मालवण टीम आणि सॉफ्टलॅब्स ग्रुपचे सीईओ मिथिलेश बांदिवडेकर यांचे विशेष आभार मानले. ज्यांच्या दृष्टिकोनामुळे मालवणमधील होतकरू मुलांना तसेच भावी पिढी जी आयटी क्षेत्रामध्ये भविष्य घडवू पाहत आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय ग्राहकांबरोबर कशा प्रकारे काम केले जाते आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन मिळाले.