ग्रामस्थांनी मानले आमदार राणे यांचे आभार
कुडाळ :
सन 2021-22 या आर्थिक वर्षात नेरुर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरीसुविधा योजनेअंतर्गत नेरुर वाघचौडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे हे काम मंजूर झालेले होते परंतु काही कारणास्तव सदर काम गेली तीन वर्षं रखडलेल्या अवस्थेत होते त्यामुळे वाघचौडी मध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांची रस्त्यात न झाल्याने गाडी चालवताना मोठी अडसर निर्माण होत होती.गेली कित्येक दिवस सदर रस्ता व्हावा म्हणून ग्रामस्थ निवेदन देत होते तरी सदर रस्ता मंजूर असुनही होत नव्हता ही बाब ग्रामस्थांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणे यांच्या कानावर विषय सांगितल्यावर त्यांनी लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व त्याची एक प्रत गटविकास अधिकारी कुडाळ यांना लेखी पत्र देत सदर रस्ता अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे करण्यात यावा असा आदेश काढला त्याप्रमाणे आज रस्ता पुर्ण झाल्या बद्दल नेरुर वाघचौडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार राणे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी आमदार राणे यांची प्रत्यक्ष भेट घेवून ही आभार मानण्यात येणार आहेत असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.