श्री देव कुणकेश्वर चरणी चांदीचा टोप अर्पण
देवगड कुणकेश्वर
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे स्वयंभु महास्थळ श्री देव कुणकेश्वर चरणी लाखो भाविक येवून नतमस्तक होवून दर्शन घेतात आणि आपआपली मनोकामना व्यक्त करतात. नवसाला पावणारा – हाकेला धावणारा श्री कुणकेश्वर स्वयंभु महादेव भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. मे. म्हस्के मंगल सराफ तिसगांव, ता- पाथर्डी, जि- अहिल्यानगर यांनी आज कुणकेश्वर चरणी सुमारे ३.५० लाख रुपये किंमतीचा चांदीचा टोप अर्पण केला. असे अनेक शिवभक्त वर्षानुवर्षे सेवा करतात. यापूर्वी देखील अनेक शिवभक्तांनी चांदीचे अभिषेक पात्र, चांदीचे आसन, चांदीची प्रभावळ, चांदीची दैनंदिन पुजा दरम्यान लागणारी चांदीची भांडी सामान अर्पण केलेले आहेत. या सर्वांचे श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट-कुणकेश्वर वतीने यथोचित सन्मान व आभार मानण्यात आले.