सावंतवाडी : ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने ओटवणे शाळा नं. १ च्या रंगमंचावर रविवार २३ मार्च रोजी रात्री ८ वाजता २० X २० डबलबारीच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
डबलबारीचा हा सामना वpर्दे येथील हनुमान प्रसादीक भजन मंडळाचे बुवा गुंडू सावंत, विराज बावकर (पखवाज), तबला संकेत गोसावी (तबला) विरुद्ध देवगड लिंगडाळ येथील श्री वडची देवी प्रासादीक भजन मंडळाचे बुवा संदीप लोके, योगेश सामंत (पखवाज), संदेश सुतार (तबला) यांच्यात होणार आहे.
डबलबारी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने बबलू गावकर यांनी केले आहे.