You are currently viewing हिम्मत लागते…शिंगावर घ्यायची…!!

हिम्मत लागते…शिंगावर घ्यायची…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हिम्मत लागते…शिंगावर घ्यायची…!!*

 

एका कवीच्या ओळीची

दशहत कां वाटावी ….

सत्तेच्या मखरात बसणा-यांना

इतकी कां टोचावी…

 

आज सिंहासनावर बसलेले

उद्या असणारही नाही

सिंहासन आहे भाड्याचं

कुणाच्या मालकीचं नाही…

 

मस्तवाल भ्रष्टाचारी बेफिकीरांना

कवीओळींचा दणका बसतो

शब्दांचा आवाज कानातून

काळजाला दागण्या देतो..

 

अंगावर यायची हुल देणा-यांना

हिम्मत लागते शिंगावर घेण्याची

हत्या-यापेक्षा शब्द दाहक

हिम्मत लागते कवीची ओळ ऐकण्याची

 

या मातीत सा-यांच रक्त सांडलं

ही माती नाही कुणाच्या बापाची

सत्ता येईल…सत्ता जाईल…

ही जमीन नाही कुणाच्या मालकीची

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा