*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”कविता रस रंग”*
कविता असते सजीव लावण्यमूर्ती
शब्द प्रसवती करी भाव रस पुर्ती!! धृ!!
घेऊन जाते कल्पनेतील भाव विश्वांत
रिजवते जोजवते हसवे प्रेमानं
भक्ती शृंगार शौर्य रस करी जागृती!!1!!
कविता देतात मनाला स्फूर्ती उभारी
आकाशी विहंगापरी घेई भरारी
इंद्रधनु कल्पना रंगवी काव्य स्फूर्ती!!2!!
काव्य भक्ती गंगा अवतरते शब्दांतूनी
नटलेली असते विविध रंग रसानी
देई संदेश सज्ञान करी कल्पनापूर्ती!!3!!
धीर गंभीर खळाळती झऱ्या प्रमाणं
हिंदोळ्यावर नाचते फुलपाखरा सम
जीवन करी समृद्ध दुःख हरती!!4!!
श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.