इन्सुली तुळसाण पूलावर इनोव्हा कार पलटी होऊन झाला अपघात
बांदा : प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गवरील इन्सुली तुळसाण पूलावर इनोव्हा कार पलटी होऊन अपघात झाला. सदर वाहन पुणे पासिंगचे असून गोव्याच्या दिशेने जात होते. अपघातानंतर इनोव्हामधुन (एमएच १२आरआर१८२५) लाल दिवा बाहेर पडल्याने अपघातग्रस्त अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. सदर अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. मात्र पोलिसांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. अपघातानंतर दोन्ही जखमीना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पलटी झालेल्या इनोव्हा कारला स्थानिक ग्रामस्थांनी बाजूला केली. अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.