BSNL चा मनोरा कार्यान्वित होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही….
वायंगणी कार्य क्षेत्रातील महसूल गाव तळेकर वाडी मधील ग्रामस्थांनी दिला इशारा
सावंतवाडी
वायंगणी कार्य क्षेत्रातील महसूल गाव तळेकर वाडी मध्ये हरिचरणगिरी येथे भारत संचार निगम ली कंपनी चा मनोरा उभारण्यात आलेला असून, हा मनोरा मागील सुमारे ७/८ महिन्यापूर्वी काम पूर्ण झालेले आहे. अदयापही मनोरा कार्यान्वित झालेला नाही. सातत्याने BSNL विभागाला पाठपुरावा करून देखील त्याचीच दखल भारत संचार निगम ने घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा उपस्थित नागरिकांनी दिला आहे.
वायंगणी ग्रामपंचायत च्या वतीने टाॅवर कार्यान्वित करण्यासाठी सावंतवाडी येथील बी.एस.एन.एल ऑफिस च्या बाहेर उपोषण आयोजित करण्यात आले या उपोषणास पाठींबा देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, शिंदे गट तालुका प्रमुख श्री नितीन जी मांजरेकर, शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हा प्रमुख रूपेश राऊळ सावंतवाडीतालुका प्रमुख मायकल डिसोजा वेंगुर्ला तालुका प्रमुख बाळू परब आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच श्री दत्ताराम (अवी) अरुण दुतोंडकर, उपसरपंच श्री रवींद्र सहदेव धोंड, भाजपा सरचिटणीस श्री प्रशांत प्रभुखानोलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री आनंद दाभोलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री भिकाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री अनंत दत्तात्रय मठकर, ग्रामपंचायत सदस्य श्री अनंत केळजी, ग्रामस्थ – श्री प्रताप करंगुटकर, श्री सुनील प्रभुखानोलकर, श्री विलास मांजरेकर, श्री प्रकाश नागोळकर, श्री सचिन वाडेकर, श्री सत्यवान दुतोंडकर, श्री शशिकांत असोलकर, श्री श्रीकृष्ण हळदनकर, श्री रवींद्र शिरोडकर, श्री साहिल सावंत, श्री निलेश म्हापणकर, श्री जयेश आकेरकर, श्री समीर केळूसकर आदी उपस्थित होते.