You are currently viewing ३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा – अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड

३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा – अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा २०२४-२५ च्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवड झालेल्या नाटकांची घोषणा केली.

स्पर्धेत २३ व्यावसायिक नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. या नाट्यसंस्थांनी उत्कृष्ट नाट्यप्रयोग सादर केले. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी खालील दहा नाटकांची निवड झाली आहे – शिकायला गेलो एक – (गौरी थिएटर्स), असेन मी नसेन मी – (स्क्रिप्टिज क्रिएशन्स), गोष्ट संयुक्त मानापमानाची – (नाट्यसंपदा कलामंच), वरवरचे वधुवर – (कलाकारखाना आणि शांताई), उर्मिलायन – (सुमुख मंच), नकळत सारे घडले – (नवनीत प्रोडक्शन्स), ज्याची त्याची लव्हस्टोरी – (एकदंत क्रिएशन्स), थेट तुमच्या घरातून – (प्रज्ञाकार आणि सोहम), मास्टर माईंड – (अस्मय थिएटर्स), सुर्याची पिल्ले – (सुबक)

या स्पर्धेचे परीक्षण डॉ. अनिल बांदिवडेकर, पंढरीनाथ (पॅडी) कांबळे आणि भाग्यश्री चिरमुले यांनी काटेकोरपणे केले.

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्व नाट्यनिर्माते, कलाकार व तंत्रज्ञांचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी अभिनंदन केले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेची अंतिम फेरी एप्रिल २०२५ मध्ये मुंबई येथे रंगणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा