You are currently viewing शिवजयंतीनिमित्त आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दत्तगुरु प्रतिष्ठान, परशुराम नगर व ओम कालभैरव चॅरीटेबल ट्रस्ट (वडाळा) तसेच नवऊर्जा फाउंडेशन यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन परशुराम नगर येथे करण्यात आले.

या वेळी नवऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील चंदने, खजिनदार सचिन कसाबे, दत्तगुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतिश कोळी आणि सचिव अनिल शिगवण उपस्थित होते.

शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेतला व मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणीचा लाभ घेतला. सामाजिक बांधिलकीतून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम उल्लेखनीय असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा