मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शिव उद्योग संघटना सक्रियपणे कार्यरत आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी संघटनेने विविध जिल्ह्यांत नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद यांनी या नियुक्त्या जाहीर करताना नव्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
*नवनियुक्त पदाधिकारी:-* गीता जेधे – कोल्हापूर जिल्हाप्रमुख, डॉ. सतिश बजरंग मोरवाल – अकोला जिल्हाप्रमुख, महेश सावंत – नवी मुंबई जिल्हाप्रमुख, दिनेश श्रीरामज्वर – नांदेड जिल्हाप्रमुख, सुनील आक्रेकर – पालघर जिल्हाप्रमुख, सुवर्णा जाधव – रायगड महिला जिल्हाप्रमुख, अजय गंगाधर स्वामी – खेड तालुका प्रमुख, योगेश खोपडे – पुणे शहर प्रमुख, इम्तियाज शेख – खारघर शहर प्रमुख, श्रीकांत किल्लेकर – पनवेल शहर प्रमुख, आनंद ज्ञाने – पनवेल विधानसभा प्रमुख, गौरव गायकवाड – कसबा विधानसभा प्रमुख, अतुल बिराजदार – भोसरी विधानसभा शिक्षण समिती प्रमुख, सचिन महादेव शिळीमकर – खडकवासला विधानसभा प्रमुख, सोनाली कातूरे – पुरंदर महिला तालुका प्रमुख, स्वाती कातूरे – पुणे महिला आरोग्य समिती प्रमुख, दयानंद खराटे – पुणे जिल्हा आरोग्य समिती प्रमुख, मनिषा जाधव – सासवड महिला तालुका प्रमुख, स्नेहलता बाडकर – गडहिंग्लज महिला तालुका प्रमुख, ज्योती नाडकर्णी – खारघर महिला शहर प्रमुख, गायत्री जवळगीकर – पुणे जिल्हा शिक्षण समिती प्रमुख, मंजू तोमर – नवी मुंबई इव्हेंट समिती प्रमुख, कल्पना रेळे – इव्हेंट समिती प्रमुख, मुंबई, कल्पना जाधव – विवाह समिती पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख, संजय डुबल – इव्हेंट समिती उपप्रमुख, वनिता भालेकर – खडकवासला रोजगार समिती प्रमुख, प्रो. नंदिनी सुरते – रोजगार समिती महिला, पुणे शहर प्रमुख, संजय शंकर चव्हाण – पुणे जिल्हा रोजगार समिती प्रमुख, प्रयाग मिश्रा – रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, स्नेहल ननावरे – कल्याण ग्रामीण संपर्क प्रमुख, डॉ. निखिल किबे – राज्य कार्यकारिणी सदस्य
संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद यांनी नव्या नियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की ही नवीन टीम रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
शिव उद्योग संघटना आपल्या कार्यक्षमतेमुळे महाराष्ट्रभर नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. या पुढाकारामुळे अनेकांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून, राज्याच्या औद्योगिक प्रगतीला वेग येणार आहे.