You are currently viewing कोणताही निर्णय घेताना दीपक केसरकर यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही – संजू परब

कोणताही निर्णय घेताना दीपक केसरकर यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही – संजू परब

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून संजू परब यांचे जंगी स्वागत

सावंतवाडी :

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष येत्या काळात नंबर वन बनवला जाईल. आमदार दीपक केसरकर हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते सांगतील त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण वागणार. कोणताही निर्णय घेताना दीपक केसरकर यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. आमच्या पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक आहेत असे नूतन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे मिळालेले पद हे शोभेसाठी नाही तर कामातून त्या पदाची किंमत दाखवून देईन असे परब यांनी सांगितले. श्री परब यांचे आज सावंतवाडी येथील आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक व संजू परब समर्थक यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी कार्यक्रम आयोजित करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. श्री परब यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आपली ही जिल्हाप्रमुख म्हणून पहिलीच पत्रकार परिषद आहे. मला या मतदारसंघात भरीव असे काम करायचे आहे. आमदार दीपक केसरकर हे आमचे सर्वेसर्वा आहेत. ते जे काय निर्णय घेतील त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. मात्र आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा कुठेही कोणी अपमान केल्यास आम्ही ते सहन करणार नाही आणि अपमान होऊ दिला जाणार नाही. या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय आणि मानसन्मान देण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर म्हणाले, संजू परब यांच्याकडे नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी ते समर्थपणे पेलतील. आता शिवसेनेमध्ये नवीन सभासद नोंदणी सुरू आहे. तिन्ही मतदारसंघात मोठ्या संख्येने सभासद नोंदणी अभियान परब यांच्या नेतृत्वाखाली राबवले जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अशोक दळवी, नारायण राणे, गणेश प्रसाद गवस, नितीन मांजरेकर, बाबू कुडतरकर, राजू निंबाळकर, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, प्रेमानंद देसाई, देव्या सूर्याजी, सुधा कवठणकर, दिनेश सावंत, अनारोजीन लोबो, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, भारती मोरे, सरपंच सौ सुहासिनी सौदागर, सौ. गावकर, परीक्षित मांजरेकर, हेमंत बांदेकर, बंटी पुरोहित, विनोद सावंत, जीवन लाड, संजय पालकर, सचिन साठेलकर, श्री प्रभू, लक्ष्मण भालेकर, रवी परब, संदेश गावडे, अरविंद परब, चेतन गावडे, प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा