You are currently viewing गझलकार यशवंत त्र्यंबक पगारे “राज्यस्तरीय गझल सम्राट” पुरस्काराने सन्मानित

गझलकार यशवंत त्र्यंबक पगारे “राज्यस्तरीय गझल सम्राट” पुरस्काराने सन्मानित

औरंगाबाद:-

औरंगाबाद येथील दैनिक साहित्य तेज याचा वर्धापन दिन व कविसंमेलन दिनांक १६/०३/२०२५ रोजी ज्येष्ठ साहित्यिक श्री भरत सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

सदर दैनिकाच्या संपादिका सुप्रिया जाधव आहेत. एक महिला असूनही त्यांनी हा मोठा कार्यक्रम यशस्वी करून दाखविला.

सदर कार्यक्रमात बदलापूर(जि.ठाणे) येथील कवी/गझलकार श्री यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांना “राज्यस्तरीय गझल सम्राट” ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंत पगारे यांचा हा अकरावा पुरस्कार आहे. सदर कार्यक्रमास साहित्यिक कवी गुलाबराजा फुलमाळी ,विडंबनकार संजय आहेर,सुप्रसिद्ध निवेदक बाळासाहेब गिरी देखील हजर होते.

तिथे त्यांनी सादर केलेली “बरे वाटले” ही गझल पूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतली होती.

ह्या पुरस्काराबाबत सर्वांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा