मृत गाईच्या विल्हेवाटीसाठी महेंद्र म्हाडगुत यांनी स्वखर्चाने केली मदत…
मालवण
शहरातील रेवतळे येथील डॉ. ठाकूर दवाखाना नजीकच्या परिसरात मृत झालेल्या गाईची माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनी स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून देत विल्हेवाट लावली याबाबत स्थानिक नागरिकांनी श्री. म्हाडगुत यांचे आभार मानले.
दरम्यान गाय मृत झाल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पालिका प्रशासनास याची माहिती दिली मात्र पालिके कडे उपलब्ध असलेल्या जेसीबी वर चालकच नसल्याने पालिका प्रशासन जेसीबी उपलब्ध करून देऊ शकला नाही याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मृत गाईमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांना देताच त्यांनी स्वखर्चातून जेसीबी उपलब्ध करून दिला त्यानंतर त्या मृत गाईची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. म्हाडगुत यांनी तत्काळ दखल घेतल्याने स्थानिकांनी त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.