सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोगतज्ञ डॉक्टर असता तर या हि युवकाचा जीव वाचला असता – रवी जाधव
सावंतवाडी उपजिल्हारुग्णालयात डॉक्टर अभावी अजून किती जणांना प्राण गमवावे लागतील?
सावंतवाडी
रात्री 12 च्या सुमारास तळवडे येथील एका 30 वर्षीय युवकाला अस्वस्थ वाटू लागले त्यावेळी तळवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वप्रथम त्याला नेण्यात आले परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्या युवकाच्या म्हणण्यानुसार त्याला त्याच्या मित्रांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तत्काळ दाखल केले परंतु सावंतवाडी रुग्णालयामध्ये सुद्धा हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभावी त्या युवकाला स्ट्रेचरवरच प्राण गमवावा लागला हे त्याचे दुर्दैव म्हणावे लागेल परंतु येथे अजून किती प्राण जातील या विषयाचं कोणाला गांभीर्य आहे का असा सवाल जमलेल्या नागरिकांनी उपस्थित करून सदर रुग्णालया बाबत तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला.
सावंतवाडी शहरासारख्या भागात डॉक्टर अभावी लोकांची जीव जात असतील तर आपल्या शहरवासीयांचे दुर्दैवच म्हणावे लागेल अशी नाराजी रवी जाधव यांनी व्यक्त केली.
असे निष्पाप जीव जात असलेले पाहून नेत्यांना काहीच वाटत नाही का असाही सवाल उपस्थित होत आहे. अजून किती दिवस शांत राहायचं आता या गंभीर विषयाबाबत आवाज उठलाच पाहिजे येथील नेत्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी येत्या आठ दिवसात शहरातील व ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभ करणार असल्याचा इशारा येथील हॉस्पिटलला दररोज रात्र व दिवसा तीन तास विनामूल्य सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव,रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांनी दिला आहे.
सुरज डिचोलकर हा एक सामाजिक कार्यकर्ता होता प्रत्येकाच्या संघटना दाबायचा. त्याच्या जाण्याने मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली त्याचे मित्र खूप रडतं होते हे चित्र खूप वाईट होते