You are currently viewing वैशाख सावली

वैशाख सावली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वैशाख सावली*

 

*झाडाखाली पांथस्थ विसावे*

*वैशाख वणवा होतसे काहिली*

*वाटे हवीशी छाया शीतल*

*उष्णता तनुस नच साहिली….१*

 

*झाड ते ओशाळुनिया गेले*

*पर्ण नसती सावली द्याया*

*बघ कसा रे असमर्थ मी*

*उन्हाने तापली तव‌ काया….२*

 

*फांदी एक ना उरली आज*

*कुरवाळाया प्रेमाने तुजला*

*मंद झुळूक ही नाही आज*

*जोजवता नच येई मजला….३*

 

*बघ सामोरी फुलला बहावा*

*लालबुंद गुलमोहर बहरला*

*देतील तुजला वैशाख सावली*

*ऐकुनी पांथस्थ गहिवरला…..४*

 

*आज वठलेला पुन्हा डवरशील*

*शाखा तुझिया नव्याने फुलतील*

*फुला फळांनी बहरून येशील*

*बंध आपुले कधी ना तुटतील..५*

 

*डॉ मानसी पाटील*

*मुंबई*

प्रतिक्रिया व्यक्त करा