ठाणे :
मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे, मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे नुकतेच ३४ वे राज्य स्तरीय काव्य संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. या अभूतपूर्व यशस्वी सोहळ्यात जवळपास ५०० साहित्यिकांचे साहित्य प्राप्त झाले. त्यात २० साहित्यिकांना विद्याभूषण , समाजभूषण, कलाभूषण, साहित्यभूषण, तसेच कवितासंग्रह, कथासंग्रह, आत्मचरित्र,बालकथासंग्रह अशा विविध प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच तीस कवी स्पर्धकातून पाच स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त वीस ते तीस कवींनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी मा. प्रा. अशोक बागवे होते तर विशेष अतिथी ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, ज्येष्ठ कवयत्री ललिताताई गवांदे , माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी मा. सुरेश लोहार होते तर प्रमुख पाहुणे माजी संमेलनाध्यक्ष मा डॉ विनायकराव जाधव, ज्येष्ठ लेखक सिध्दार्थ कुलकर्णी, मा. राजेश थळकर , ज्येष्ठ कवयत्री मा.उर्मिला घरत, विद्या थोरात – काळे आदी मान्यवर कवी , साहित्यिक, पत्रकार उपस्थित होते. या संमेलनाचे संयोजन कांचन राणे (ठाणे शहर अध्यक्षा ) यांनी केले तर आयोजन डॉ राजेंद्र कवाडे, आणि प्रणिता देवरे (ठाणे जिल्हा उपाध्यक्षा) यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदका अनघा जाधव नेरूळ नवी मुंबई यांनी केले.