*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*न सुटलेले एक कोडे*
खाली हाथ आया था
खाली हाथ जायेगा
माहीत आहे सर्वांना
कशासाठी मग त्रागा
असले जरी कितीही खरे
मुळीच पटेना हे मनाला
बंद मुठीचे काय रहस्य
कळलेच नाही कुणाला
प्रत्येकाची होती बंद मूठ
जेव्हा आलो जन्माला
गच्च मुठीत होते सुख
दिसलेच नाही कुणाला
मूठ उघडताच सांडले
मुठीतले सारे सुख
सुख शोधता शोधता मात्र
पदरी पडले फक्त दु:ख
बंद मुठीतले खरे सुख
सारेच आज हरवून बसले
पैसा म्हणजेच सर्वस्व
हेच पक्के मनात ठसले
येताना जे आणले होते
ते पैशानेही मिळत नाही
जातानाही एकटाच जातो
नेण्यासारखे नसतेच काही
बंद मुठीचे हे रहस्य
उलगडले आज थोडे
सुख म्हणजे नेमके काय?
न सुटलेले एक कोडे
@अरुणा गर्जे
नांदेड