*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रंग पंचमी….*
अशाच एका सायंकाळी,
अवचित गेली नजर आभाळी!
दिसला मजला तो मनमाळी,
खेळत रंगांची ती होळी !…..१
करी घेऊनी ती पिचकारी,
होई उधळण ती मनहारी!
सप्तरंगांची किमया सारी,
रंगपंचमी दिसे भुवरी !…..२
सांज रंगांची ती रांगोळी,
चितारतो तो कृष्ण सावळी!
क्षितिजी उमटे संध्या लाली,
पश्चिमेवर तो सूर्य मावळी!….३
फाल्गुनाच्या उंबरठ्यापाशी,
सृष्टी अशी रंगात बरसली!
घेऊन नवचैतन्याच्या राशी,
चैत्र गुढी ही उभी राहीली !…..४
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे