जेष्ठ नागरिक सेवा संघ कणकवलीची मासिक सभा संपन्न
कणकवली
जेष्ठ नागरिक सेवा संघ कणकवलीची मासिक सभा दिनांक 19 मार्च 25 रोजी विरंगुळा केंद्र कणकवली येथे झाली .यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.भालचन्द्र मराठे.कणकवली तालुका अध्यक्ष श्री मनोहर पलयेकर सल्लागार.श्री सीताराम कुडतडकर उपाध्यक्ष श्री.अर्जुन राणे व सचिव श्री.प्रमोद लिमये हे उपस्थित होते.यावेळी या सभे नंतर श्री.शंकर नरहरी कुंटे यांच्या 90 वर्षे वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक संघा तर्फे सन्मान करणेत आला.यावेळी सर्वानी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमावेळी बोलतान श्री.कुंटे गुरुजी यांनी आदर्श जीवन शैली तसेच पैसा हे साध्य नाही साधन आहे.तसेच आंनदी व समाधानी जीवन जगावे.प्रत्येक गोष्टीत आनंद घयावा.सुख उपभोगताना त्यात आनंद शोधावा असे विचार मांडले.त्यांचा सन्मान जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.मराठे यांनी सन्मान पत्र शाल श्रीफळ देऊन केला.
यावेळी श्री .दादा कुडतडकर श्री.अर्जुन राणे.सौ.श्रद्धा तांबे.श्री.मनोहर पालयेकर यांनी विचार मांडले व शुभेच्छा दिल्या तसेच याचे प्रस्ताविक व आभार श्री.प्रमोद लिमये यांनी मानले.यावेळी श्री.कंटे गुरुजी यांनी जेष्ठ नागरिक सेवा संघ कणकवली साठी रुपये.5000 देणगी दिली.यासाठी जेष्ठ नागरिक संघ त्यांचे आभारी आहेत.