आंबोलीत गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी
सावंतवाडी
आंबोली जकातवाडा येथून नागरतासच्या दिशेने दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. दिनेशकुमार जीवनराम वर्मा ( ३५, रा. मूळ राजस्थान आंबोली जकातवाडी ) असे त्याचे नाव आहे. त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर रिक्षाचालक भाऊ पाटील यांनी त्याला प्रथम आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.