आंबोली बाजारपेठेत आई व मुलाला उडवुन गाडी थेट घुसली एका दुकानात
आंबोली
भरधाव वेगाने जाणाऱ्या पंढरपूर येथील पर्यटकांच्य्या कारने आंबोली बाजारपेठेत आई व मुलाला उडवले व गाडी थेट तेथील एका दुकानात घुसली. ही घटना आज दुपारी आंबोली बाजारपेठेत घडली. साखरी जानू कोकरे (वय ७२) आणि बमु जानू कोकरे (वय ३३) असे जखमींचे नाव आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सावंतवाडीत हलविण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी सचिन दत्तात्रय कांबळे (वय ३५) आकाश विठ्ठल राऊत (वय ३३, दोघे रा. पंढरपूर) यांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दोघेजण पळून जाण्यास यशस्वी झाले आहे. संबंधित पर्यटक हे मध्य धुंद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेनंतर त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.जखमींवर प्राथमिक रुग्णालयाचे डॉक्टर महेश जाधव, आदिती पाटकर यांनी उपचार केले. आरोग्य सहायिका के.एस.पुराणिक, परिचारिका सीमा शेर्लेकर यांनी सहाय्य केले. आरोग्य केंद्रात सुनील नार्वेकर,दिलीप सावंत,पंढरी कर्पे, उपसरपंच दत्तू नार्वेकर, सचिन नार्वेकर,महेश नार्वेकर आदींनी आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे १०८ ने नेण्यात आले. आंबोली पोलिसांनी आरोग्य केंद्रात भेट दिली.हवालदार दीपक शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू आहे. ते कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.