देवगडात २१ मार्चला निर्धार रॅली
देवगड :
देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने दि.२१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता तहसिल कार्यालय देवगड येथे बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती निर्धार रॅली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेज नाका ते तहसीलदार कार्यालय अशी धम्म रॅली (मोर्चा ) होणार आहे.
यामध्ये हजारोंच्या संख्येने संपुर्ण देवगड तालुक्यातील धार्मिक सामाजिक शैक्षणिक संघटना युवातरुण महीला कार्यकर्ते पदाधिकारी धम्म उपासक उपासिका समाज बांधव निर्धार धम्म रॅलीत सहभागी होणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष शामसुंदर जाधव व सचिव सुनील जाधव यांनी केले आहे.