You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सावंतवाडी येथे जिल्हा कार्यकरिणीतर्फे सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, सादर सभेत जिल्ह्यात किमान ५००० सदस्य नोंदणी करण्याचे उद्धिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच ओ. बी. सी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. कल्याणकाका आखाडे यांचा महाराष्ट्र पदाधिकारी संवाद अभियान दौरा दिनांक. २१/०३/२०२५ रोजी असून ओ.बी.सी सेलचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी आजच्या सभेत याचे नियोजन करण्यात आले.
सदर सभेत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. अबीदजी नाईक, जिल्ह्याचे चिटणीस श्री. सावळाराम आणावकर गुरुजी, प्रदेश चिटणीस श्री. सुरेशजी गवस, प्रदेश चिटणीस श्री. एम.के.गावडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. एम.डी. सावंत, संदीप राणे, ओ.बी.सी सेलचे जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. साबाजी सावंत, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष श्री. असलम खतीब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. उदय भोसले,
कुडाळ तालुकाध्यक्ष श्री. आर. के.सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री. संदीप पेडणेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष श्री. सत्यवान गवस, उपाध्यक्ष श्री. मेघेन्द्र देसाई, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षा सौ. रिद्धी परब, दोडामार्ग महिला तालुकाध्यक्षा सौ. मानसी देसाई, विलास पावसकर, जिल्हा सदस्य गुरुदत्त कामत, रोहन परब, दीपक देसाई, कुडाळ येथून श्री. मिनानाथ बाबुराव वारंग, राजू वळवी, विराज बांदेकर, योगेश हेरेकर, तसेच कणकवली येथून श्री . निशिकांत कडुलकर, सतीश पताडे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा