वेंगुर्ला तालुकावासीयांच्या वतीने नववर्ष पाडवा निमित्त भव्य दिव्य स्वागत यात्रेचे आयोजन
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुका वासीयांच्या वतीने हिंदू नववर्ष पाडवा निमित्त भव्य दिव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ३० मार्च २०२५, रोजी सायंकाळी ५.०० वाजता श्री देव रामेश्वर मंदीर येथून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे.
स्वागतयात्रेचा मार्ग
रामेश्वर मंदिर – शिरोडा नाका- दाभोली नाका-
मार्केट – मारुती मंदिर – रामेश्वर मंदिर असा असणार आहे
तरी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व बंधू-भगिनींनी पारंपारिक, मंगल वेशात नववर्षाच्या स्वागत यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन निमंत्रकः हिंदू धर्माभिमानी मंडळी, वेंगुर्ला यांनी केले आहे.