मालवण :
कांदळगावच्या त्रिशाला कदम यांना पंचशील ट्रस्ट ओरोस,आदर्श नगर सिंधुदुर्ग यांच्यावतीने शीला खोटलेकर स्मृती राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन ठाणे पश्चिम येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी भंते संघरत्न, ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर, वृंदा पेंडूरकर अजित सोनवडेकर, सिद्धार्थ जंगम, पराग तांबे, अमर जाधव, शितल पवार, दिनेश जाधव, आणि पंचशील ट्रस्टचे सदस्य सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना त्रिशाला कदम म्हणाल्यात माझ्या शैक्षणिक सेवेच्या कार्याची दखल घेऊन आज माझा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन जो गौरव करण्यात आला याचे सर्व श्रेय मी माझे सर्व विद्यार्थी, सर्व सहकारी शिक्षक, सर्व तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, माझे बांधव, ग्रामस्थ, पालक वर्ग आणि माझ्या परिवाराला देईन. मी प्रामाणिकपणे शैक्षणिक योगदान प्रत्येक प्रशालेमध्ये देत गेले होते. माझ्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले हाच माझा खरा बहुमान आजपर्यंत मी समजत आले. पंचशीला ट्रस्ट या संस्थेचे कार्य खूप महान असून या संस्थेची मी कायम ऋणी राहीन.
यावेळी या ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर यांनी संस्थेचे विविध उपक्रम आणि संस्थेचा उद्देश याबाबत मार्गदर्शन केले. त्रिशाला कदम यांना यापूर्वी सुद्धा अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्रिशाला कदम यांच्या या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत कांदळगाव, मसुरे, मालवण भागामध्ये कौतुक आणि अभिनंदन होत आहे.यावेळी बौद्ध समाजाचा कोकणस्थ वधू वर मेळावा ही संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग तांबे यांनी केले.
