*सरली सुरेख थंडी*
*फोफावला उन्हाळा*
*सतप्त सुर्य आता*
*ओकेल तप्त ज्वाळा*
*पक्षी दिशा दिशांना*
*फिरतील ते थव्यांनी*
*सुकतील कंठ त्यांचे*
*मग शोधतील पाणि*
*सुकली तळी जळाची*
*पाणि पिण्यास नाही*
*त्या सानुल्या जिवांची*
*होईल लाही लाही*
*त्यांच्या जिवा करीता*
*ईतकी कराल काय सेवा*
*वाटी भरुनी पाणि ठेवा*
*वाटी भरुनी ठेवा*
*संग्रह#अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*
🦜🦜🦜🦜🦜🦜
