You are currently viewing इंडीयन पोलीस मित्र मंडळ तर्फे ठाणेदार रुपेश साखरगे साहेब यांचे स्वागत

इंडीयन पोलीस मित्र मंडळ तर्फे ठाणेदार रुपेश साखरगे साहेब यांचे स्वागत

अंढेरा ता . देऊळगाव राजा जि. बुलढाणा येथिल ग्रामिण अंढेरा पोलीस स्टेशनचे नविन रुजू झालेले ठाणेदार मा. रुपेश सखरगे साहेब यांनी पदभार घेतला. बुलढाणा जिल्हा इंडियन पोलीस मीत्र मंडळाचे अध्यक्ष समय कुमार जाधव अंचरवाडी, सामाजिक कार्यकर्ता तथा चित्रपट अभिनेते आणि सहकारी यांनी आत्ता पदभार घेतलेले अंढेरा ता. देऊळगांव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांचा मित्र मंडळा तर्फे बुके देवून सत्कार करण्यात आला. सोबत्अंढेरा येथिल सामाजिक कार्यकर्ता श्री विलासराव इंगळे हे हजर होते. यावेळी पोलीस मीत्र मंडळाचे पदाधिकारी तथा पोलीस स्टेशन अंढेरा चे सर्व कर्मचारी वृंद हे हजर होते. इंडीयन पोलीस मित्र मंडळ हे संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक बांधीलकी जोपासत असून पोलीस मीत्र म्हणून सहकार्य करीत आहेत. विविध जिल्ह्यात मंडळच्या शाखा असून सामाजिक सलोखा आणि समरसता शांतता ठेवण्यास सतत कार्यरत असते. ठाणेदार श्री रुपेश सखरगे यांनी पोलीस मित्र मंडळाचे अध्यक्ष समय समय कुमार जाधव यांच्या कार्याचे कौतूक केले. व त्यांना भावी कार्यासाठी शुभकामना दिल्या. जाधव यांनी याकार्या सोबतच आपला चित्रपट, नाटक, अभिनय छंद जोपासला असून त्यांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा