You are currently viewing नरडवे धरणग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेजचे होणार वाटप;पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश

नरडवे धरणग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेजचे होणार वाटप;पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश

*नरडवे धरणग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेजचे होणार वाटप;पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश.*

*जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले निर्देश

*प्रकल्पग्रस्तांना स्वेच्छा पुनर्वसन अनुदान ही मिळणार.

*जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानभवनातील दालनात बैठक यशस्वी

२००२ सालापासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पाला मिळणार चालना

मुंबई
नरडवे धरणग्रस्तांचे जाहीर केलेले आणि दोन वर्षांपासून रखडलेले पर्यायी जमिनी ऐवजी विशेष आर्थिक पॅकेज प्रकल्पग्रस्तांना तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नरडवे धरणग्रस्त कृती समितीच्या सदस्यांसह विधानभवनात मंत्री गिरीश महाजन यांची आज भेट घेतली व प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधले.

कणकवली तालुक्यातील अतिशय महत्वाचा नरडवे धरण प्रकल्प रखडला असून पालकमंत्री नितेश राणे यांनी त्याला चालना देण्याचे ठरविले आहे.२००२ सालापासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले मात्र प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या अजून ही कायम आहेत.२०२३ पासून प्रकल्पाचे काम पूर्णतः ठप्प असून पालकमंत्री नितेश राणे यांनी जलसंपदा मंत्री यांची यासंदर्भात आज भेट घेतली.

प्रकल्पग्रस्तांसाठी २०२२ ला पर्यायी शेतजमीन ऐवजी विशेष आर्थिक पॅकेज मंजूर झाले.मात्र अद्यापपर्यंत त्याचे खातेदारांना वाटप करण्यात आलेले नव्हते. नरडवे धरणग्रस्त कृती समितीच्या सदस्यांसह पालकमंत्र्यांनी आज भेट घेऊन हे पैसे तातडीने वाटप करण्याची विनंती जलसंपदा मंत्र्यांना केली.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही तातडीने हे पैसे वितरीत करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत १५२ प्रकल्प खातेदारांसाठी स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मागणी केली होती.जानेवारी २०२० ला हा प्रस्ताव शासन स्तरावर मान्यतेसाठी पाठविलेला होता.त्याकडे ही पालकमंत्री यांनी जलसंपदा मंत्री यांचे लक्ष वेधले.त्याला ही जलसंपदा मंत्री यांनी संमती दिली असून लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.तसेच वाढीव कुटुंबाच्या यादीनुसार भूखंड अथवा अनुदान खातेदारांना मिळण्याकडे ही पालकमंत्री यांनी जलसंपदा मंत्री यांचे लक्ष वेधले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानभवनातील दालनात झालेल्या या बैठकीस सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील,अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग,कार्यकारी संचालक कोकण पाटबंधारे विकास महामंडळ,तसेच संबंधित अन्य अधिकारी,संदेश ऊर्फ गोट्या सावंत व नरडवे महमदवाडी धरणग्रस्त कृती समितीचे सदस्य उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा