*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*किती उतावीळ*
असे रोजचा गोड उकाडा
जातेस भेटाया *गच्चीवर*
दर्शन घेऊन भर्रकन येतेस
प्रसन्न होतो गणेश तुझ्यावर
तेल घालून *नयनामध्ये*
रक्षण करतो देव गजानन
असला जरी तो स्वर्गामध्ये
उघडे असती तीक्ष्ण लोचन
ईच्छा असून भक्ता भेटायची
नाही मोडत *रीतीरिवाज*
उतावीळ होऊंदे भक्त कितीही
संथ वल्हवतो आपल जहाज
असूदे आतूर भक्त कितीही
देवा असते *आचार संहीता*
उठल्यासुटल्या भक्त जनांना
भेटल्यास होतो मोठा *गुंता*
किती उतावीळ होणार आता
काढावी आपण थोडी *कळ*
देवही नसतो *रीकाम टेकडा*
पहात असतो तो योग्य *वेळ*
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157