*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फुकटचं …मला हवं..!!*
सतत मनोराज्ये रचली
उरी महत्वकांक्षा धरल्या
बिनाकष्ट धन हवं होतं
अपेक्षा सा-या हवेत विरल्या..
फुकटचं मला हवं होत
कुणीच काही दिलं नाही
जवळचं सार गमावून बसलो
कुणीही विचारपूस केली नाही..
फुकट्या विवेकी अतिरेकाने
वरचष्मा घालून धुरळा उडविला
जुगारसदृष्य माझ्या जगण्यावर
मर्यादेचा शाप अंगावर कोसळला..
मीच मला खडा मारून बघितला
अंगावरच फुकटाचं कातडं थरथरलं
टिकेचे बोचकारे अंगावर उमटले
तटबंदीत!स्वतःलाच सावरून घेतलं
आई बाप जे देतात
तेच फुकट असत
जगात स्वस्त!फुकटं
अस अस्तित्वातचं नसतं..
तसं कुणालाचं काही
तुमच्याशी घेणदेणं नसतं…
आई बाप जे देतात..
तेवढचं फुकटं असत..!!!!
बाबा ठाकूर