You are currently viewing हत्ती पकड मोहिमेच्या दौऱ्यासाठी वनविभाग अधिकारी, ग्रामस्थ कर्नाटकात रवाना

हत्ती पकड मोहिमेच्या दौऱ्यासाठी वनविभाग अधिकारी, ग्रामस्थ कर्नाटकात रवाना

दोडामार्ग :

रानटी हत्ती बाधित तिलारी खोऱ्यातील शेतकरी, ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग व दोडामार्ग वन विभागाने कर्नाटकात आयोजित केलेल्या हत्ती पकड मोहिमेच्या भागाची पाहणी करण्यासाठीचा दौरा आज सुरू झाला. कर्नाटकातील हसन या ठिकाणी हे शेतकरी, ग्रामस्थ, सिंधुदुर्ग व दोडामार्ग वनविभागातील अधिकारी, पत्रकार आज रवाना झाले आहेत.गेल्या काही महिन्यांपासून रानटी हत्तींचा उपद्रव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर या हत्तींना पकडण्यासाठीची मोहीम शासनाने राबवावी अशी जोरदार मागणी तिलारी खोऱ्यातील रानटी हत्ती बाधित गावागावांमधून होत होती. अलीकडे सरपंच, उपरापंच व ग्रामस्थ यांनी चिडलेल्या उपोषणादरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या कर्नाटकातील हत्तीपकड मोहिमेकडे देखील शेतकऱ्यांनी वनविभागचे लक्ष वेधले होते. त्यावेळी सर्व शेतकरी ग्रामस्थ यांना कर्नाटकातील सदर ठिकाणी घेऊन जाणार असल्याचे आश्वासन सिंधुदुर्ग वन विभागाने दिले होते. त्या अनुषंगाने हत्तीपकड मोहिमेतील भागाचा हा दौरा आजपासून सुरू झाला आहे. या दौऱ्यामध्ये वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ, वनपाल किशोर जंगले, वनरक्षक अजित कोळेकर, सुशांत कांबळे, स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, पाटये पुनर्वसन सरपंच प्रवीण पांडुरंग गवस, हेवाळे उपसरपंच समीर देसाई, ग्रा. पं. सदस्य यशवंत देसाई, तुकाराम दळवी, भाग्यश्री चारी, रवींद्र देसाई, सुमित गवस, लॉरेन्स डिसोझा, पत्रकार समीर ठाकूर, यांसह प्रमोद गवस, आप्पा राणे आदी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा