*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*होळी स्पेशल हास्य व्यंग्य*
*लाखोल्या*
नको करू तू तिच तिच बडबड
आज होळी उद्या धुळवड
भरपूर झाली आयुष्याची परवड
दोन दिवस रंग उधळायचे
लोळू दे मला गडबड
होऊन भांगेत दंग…
नाही मी सहस्र गोपिकांचा कृष्णा
असू दे तुझ्यातल्या राधेचा संग…
नको आज भडीमार
अवासिक शब्द सुमनांचा
वारे कानाजवळून जातील
इतका उधळो नशेचा रंग…
राहिन मी माझ्याच मस्तीत
चढवून होळीचे रंग
प्रयत्नही करू नये
माझ्या तपश्चर्येचा भंग
संचार असेल भोलेनाथाचे अंग…
फक्त दिसावी तुझ्यात राधा
असावा माझ्यात कृष्ण
होळीच्या रंगात खेळू रासलीला
अन् भरू जीवनात प्रेमरंग….
जळो सारी जळमटे
अभद्र ते लक्षण
लाखोल्या ही जळो होळीत
खाक व्हाव्यात राखरंग…
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
8208667477.
7588318543.