*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*क्षणभराची सुखदा*
〰️〰️〰️〰️〰️〰️
आठविता स्पर्श तोच
तुझ्याच तळहातांचा
मृदुलतम रम्यरेशमी
निरागसी भावनांचा….
नेत्र प्रांजळी भावुक
झराच तो अमृताचा
क्षणभराचीच सुखदा
तरी आधार जीवनाचा….
विरहही जरी जिव्हारी
मनी निर्झर सांत्वनाचा
चराचरी गूढ संवेदनांचे
तरी भास भावप्रितीचा….
〰️〰️〰️〰️〰️〰️
*( 27 )*
*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞 9766544908*