(३१ मे) २०२५ हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रि शताब्दी जन्मवर्ष. त्रि शताब्दी जन्मोत्सव विविध ठिकाणी, विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी आपण विविध स्पर्धांचे आयोजन करत आहोत. सर्वांनी या स्पर्धा मध्ये सहभागी व्हावे. ऑनलाईन सन्मानपत्र सर्व सहभागी स्पर्धकांना देण्यात येईल व विजयी स्पर्धकांसाठी विशेष भेट असणार.
*विषय:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर*
*स्पर्धा कालावधी :-१८/३/२५ ते १८/५/२५ पर्यंत.*
*स्पर्धा निकाल:-ऑनलाईन, २५/५/२०२५ रोजी वेळ कळविण्यात येईल*.
✍️✍️🌹🌹 *स्पर्धा प्रकार*🌹🌹✍️✍️:-
*१) चित्रकला स्पर्धा ,तुम्ही स्वतः चित्र काढत असतानाचा १ मिनिटाचा व्हिडिओ, १ फोटो ही पाठवावा*.
*२)काव्य लेखन स्पर्धा:- ५ ते ६ कडव्यांचे काव्य असावे, म्हणजेच २०-२४ ओळींचेच असावे अन्यथा स्पर्धेतून बाद असेल. काव्य मराठी भाषेतच हवे, काव्य प्रकार कोणताही चालेल*.
*३)लेख लेखन स्पर्धा:- शब्द संख्या मर्यादा:-३०० ते ५०० शब्द संख्या, मराठी भाषेतच लेख टाईप केलेला असावा*.
*४) व्हिडिओ :- २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ असावा,मराठी भाषेतच, व्यक्ती चरित्रावर आधारित, मोबाईल अडवा धरून व्हिडिओ करावा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रि शताब्दी जन्मोत्सव निमित्त व्हिडिओ चित्रीकरण स्पर्धेत मी ….. (तुमचे पूर्ण नाव,जिल्हाचे नाव,,इयत्ता सांगून) सुरुवात करावी*.
*५) रांगोळी स्पर्धा :- कोणत्याही प्रकारची (तुम्ही रांगोळी काढत असतानाचे २ फोटो पाठवावे)*.
*गट १ :- इयत्ता १ ली ते २ री*
*गट २ :- इयत्ता ३ री ते ५ वी*
*गट ३ :- इयत्ता ६ वी ते ८ वी*
*गट ४ :- इयत्ता ९ वी ते १२ वी*
*गट ५ :- वय वर्षे १८ पुढील सर्व*
सर्व स्पर्धांमध्ये प्रत्येकाला सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. *९४०५०४२९३८ या नंबर वर सर्वांनी घेतलेल्या “स्पर्धेचे चित्र/ काव्य/ लेख/ व्हिडिओ/ रांगोळी पाठवावी*.