*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्माननीय सदस्य सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*होळीत देऊन आहुती*
आतल्या गुणांना चेतवू
तेजाने उजळून जाऊ
दुष्टता जाळून होळीत
दुर्गुणांची आहुती देऊ ||१||
होळी आठवू होलिकेची
सज्जनांचे रक्षण करू
दुर्बलांना सहाय्य देऊ
भेदभाव क्रौर्य विसरू ||२||
एकता सभ्यतेची शीव
प्रेमभरे अथांग होवो |
मानवाचा हा प्रेमभाव
तेज:पुंज अथांग होवो ||३||
कवी : श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,
जि.- सिंधुदुर्ग, राज्य- महाराष्ट्र.