*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आजही दिसते तिच्यात सुनीता*
खेळत असली जरी चेंडूशी
नजर रोखून *उपग्रहांवर*
भासे जणू ती सुनिता विल्यमस
उतरणार एकोणीसला धरेवर
उलटून गेली कित्येक वर्षे
हलत नाही डोळ्यापुढून
प्रसंग होता मोठा बाका
मृत्यू बसला दबा धरून
खेळत होते बाळ सानुले
शेकत होती पाय किरणे
नीळा चेंडू *पृथ्वीसारखा*
किती मंद ते तिचे हासणे
विश्वास नाही अजून बसत
होती बसली सुनीता हंसत
विल्यमस घराणे त्यागमूर्ती
नव्हते बसले कोणी *रडत*
उर्जा आणि *स्वयं* प्रेरणा
भरली होती तीने काळजात
*नासानेही* भरला होकार
यानामधून गेली अंतराळात
उतरेल पृथ्वीवरती परवा
विश्व विक्रम ती नोंदवणार
पांग भारत मातेचे फेडून
नवा इतिहास ती रचणार
म्हणून करतो वंदन तिजला
भूमीवर आहे पाऊल तिचे
आशीर्वादाची ताकद असते
जंगी स्वागत होईल सुनिताचे
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157